FAQ / नेहमी विचारले जाणारे प्रश्न

 • प्रश्न : मला माझी कोतवाल बुक नक्कल शोधुन सुध्दा दिसत नाही ?
  उत्तर : आपण पूर्णपणे शोधुन सुध्दा दिसत नसल्याची खात्री झाल्यास कृपया संबंधित ( तहसील कार्यालय ) कार्यालयास कळवावे किंवा संपर्क करावा.
 • प्रश्न : छापील प्रमाणपत्रावर स्कॅन केलेला मजकुर दिसत नाही ?
  उत्तर : कोतवाल बुक प्रणालीमध्ये मदत या पर्यायावर जाऊन आपले संपूर्ण नावं , ई-मेल व आपल्या प्रमाणपत्राचा क्रमांक अवश्य द्यावा .सदर प्रमाणपत्र दिलेल्या ई-मेल वर मिळेल.
 • प्रश्न : मुळ अभिलेखा (स्कॅन केलेला मजकुर ) प्रमाणे व छापील प्रमाणपत्रामध्ये तफावत आहे ?
  उत्तर : आपण या विषयी सविस्तर तक्रार संबंधित तहसील कार्यालयास करावी
 • प्रश्न : माझे प्रमाणपत्र काढतांना व्यवहार पूर्ण झाला परंतु प्रिंट अथवा ती डाऊनलोड झाली नाही ?
  उत्तर : कृपया प्रमाणपत्र काढण्यापूर्वी आपले संगणक व प्रिंटर व्यवस्थित कार्य करत आहे याची खात्री करावी . शक्यतो गुगल क्रोम ब्राऊजर चा वापर करावा कारण प्रिंट च्या ऐवजी आपल्याला SAVE AS PDF पीडीएफ फॉरमॅट मध्ये save करायला सोपी जाते . तरीही आपण असमर्थ झाले असल्यास आपला तालुका व गाव आणि प्रमाणपत्र क्रमांक कळवावा . (सदर माहिती आपण अर्जदाराचे नाव मोबाईल क्रमांक भरतांना उपलब्द असते याठिकाणी पुन्हां Proceed to Payment & Print करू नये) जर आपल्या खात्यामधून रक्कम वजा झाली असेल तर आपल्यास (सेवा विभाग आपल्या तक्रारीची खात्री करूनच ) ई-मेल द्वारा प्रमाणपत्र मिळू शकते • प्रणालीमध्ये अधिकाधिक सुरळीतपणा व सुलभतेकरिता आपण अभिप्राय सुचवू शकता.
  (ई - कोतवाल बुक प्रणाली अकोला )


..
Support / Help